बेळगाव लाईव्ह : ८ ते १० दिवसांवर कन्नड राज्योत्सव येऊन ठेपला असतानाच राज्योत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी धक्कादायक निर्णय घेण्यात आला असून बेळगाव महानगरपालिका आयुक्तपदी कार्यरत असणारे अशोक दुडगुंटी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट सेलच्या संचालिका म्हणून कार्यरत असलेल्या शुभा बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अलीकडेच बेळगावमधील रस्ते विकासकामांमुळे मनपाला नुकसान भरपाईचा सामना करावा लागला. हा मुद्दा बेळगाव शहराच्या राजकारणासह नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरला.
यादरम्यान महानगरपालिकेला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. हे प्रकरण अद्याप ताजे असतानाच अचानक अशापद्धतीने बदलीचा आदेश जारी केल्याने पुन्हा उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.