Thursday, October 24, 2024

/

वस्तीगृह इमारतीवरून पडून विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मोरारजी देसाई विद्यार्थी वसतिगृहच्या इमारतीवरून खाली पडल्याने एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील हिरेगुडी (ता. चिक्कोडी) येथे घडली आहे.

मयत विद्यार्थिनींचे नांव आफ्रीन जमादार (वय 17 वर्षे) असे आहे. परीक्षा असल्यामुळे सदर विद्यार्थिनी काल मध्यरात्रीपर्यंत वस्तीगृहाच्या इमारतीवर अभ्यास करत होती.

त्यावेळी नजर चुकून अनावधानाने इमारतीवरून खाली कोसळल्याने तिचा मृत्यू झाला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. उंचावरून खाली पडलेल्या विद्यार्थिनींच्या डोक्याला जबर दुखापत होऊन कानातून रक्तस्त्राव होत असल्याचे निदर्शनास येत होते.

दरम्यान मयत विद्यार्थिनींच्या पालकांनी तिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे. चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची चिक्कोडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.