बेळगाव लाईव्ह :मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करणारे भाजप नेते बसनगौडा पाटील -यत्नाळ, सी. टी. रवी आणि चक्रवर्ती यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी, अल्पसंख्यांक विभाग बेळगाव जिल्हा आणि राज्य राज्य अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने मुस्लिम बांधवांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे.
मुस्लिम समुदाय प्रमुखांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांना सादर करण्यात आले. भाजप नेते बसनगौडा पाटील -यत्नाळ, सी. टी. रवी आणि चक्रवर्ती हे मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करण्याबरोबरच वक्फ मालमत्तेबद्दल चुकीची माहिती पसरवणे, इस्लाम आणि मुस्लिमांची बदनामी करणे आणि जातीय द्वेषाला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवून तात्काळ कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते सलीम मकानदार म्हणाले की, भाजप नेते बसनगौडा पाटील -यत्नाळ, सी. टी. रवी आणि चक्रवर्ती या तिघांनी विशेष करून मुस्लिम समुदायाबद्दल जे वक्तव्य केले आहे त्याचा आम्ही निषेध करतो.
या पद्धतीने एखाद्या समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे ही सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे या तिघांना तात्काळ अटक करण्यात यावी आम्ही निवेदन तर देत असलो तरी सरकारची ही जबाबदारी बनते की त्यांनी आपल्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक समाजाच्या सामाजिक जीवनाला, त्यांच्या एकात्मतेला संरक्षण दिले पाहिजे. मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करण्याचा हा प्रकार आत्ताचा नसून पूर्वीपासून चालत आलेला आहे.
बसवराज पाटील यांची द्वेषपूर्ण वक्तव्य सतत सुरू आहेत. मध्यंतरी धारवाडचे आमचे नेते इस्माईल दमटगार यांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत अर्वाच्च शब्दांचा वापर करून देखील प्रशासन किंवा पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही.
या पद्धतीचा प्रकार वाढतच चालला असून हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे, असे मकानदार म्हणाले. सध्याचे काँग्रेस सरकार जर या लोकांवर कारवाई करणार नसेल तर मुसलमान बांधवांना जिल्हा ग्रामीण अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष मन्सूरअली अत्तार यांनी यावेळी बोलताना राज्यातील काँग्रेस सरकारने आमच्या मुस्लिम समाजाबद्दल गांभीर्याने विचार करायला हवा.
आम्ही राज्यातील सर्व समाज एकत्र गुणागोविंदाने राहत आहोत. मात्र आमची ही एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न बसनगौडा पाटील -यत्नाळ, सी. टी. रवी, चक्रवर्ती वगैरे मंडळी करत असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे असे सांगितले.