बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण सुधारण्यासाठी सतत क्रियाशील असणाऱ्या बेळगावच्या आयएमए संस्थेला यावर्षी संपूर्ण कर्नाटकातील दुसरी उत्कृष्ट शाखा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
बेंगलोर येथील रेवा विद्यापीठात नुकत्याच झालेल्या 90 व्या वैद्यकीय परिषदेमध्ये आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप बनिशाली यांच्या हस्ते बेळगाव आयएमए शाखेला राज्यातील दुसरी उत्कृष्ट शाखा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आयएमए राज्याध्यक्ष डॉ. श्रीनिवास हेही उपस्थित होते.
आयएमए बेळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. रविंद्र अनगोळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी बेळगावच्या डॉ. माधव प्रभू, डॉ हनु पद्मजा, डॉ. किरण पाटील आणि डॉ. माधव दिक्षित यांना वैयक्तिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या समारंभास आयएमएचे माजी राज्य उपाध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ, सचिव डॉ. सुश्रुत कामोजी तसेच संपूर्ण कर्नाटकातून भारतीय वैद्यकीय संघटनेचे (आयएमए) सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.