Tuesday, September 17, 2024

/

युवकाची चार धाम सायकल यात्रा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : तीर्थक्षेत्राची वारी आपले पूर्वज पायी करत असत. मात्र आपण तरुण पिढीने तीर्थक्षेत्राची वारी हि निदान सायकलच्या माध्यमातून करावी यासाठी येळ्ळूर ते अयोध्या, बद्रीनाथ, केदारनाथ, मथुरा, आग्रा अशी सायकल यात्रा येळ्ळूर येथील अनंत धामणेकर या युवकाने आयोजित केली आहे.

तब्बल ४००० किलोमीटरचा हा एकंदर प्रवास होणार असून युवा जागृती सायकल यात्रेचा शुभारंभ आज राणी चन्नम्मा सर्कल येथून करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर युवकाला शुभेच्छा देण्यात आला.

पुढील ५० दिवस हि सायकल यात्रा चालणार असून येळ्ळूरहून सुरु झालेला सायकल प्रवास, बेळगाव, मिरज, मंगळवेढा, औसा, नांदेड, जबलपूर, मणिहार, चाकघाट, सुलतानपूर मार्गे अयोध्या धाम आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने बद्रीनाथ, केदारनाथ, मथुराहुन पुन्हा बेळगाव असा परतीचा प्रवास केला जाणार आहे.Yellur char dham

सुरुवातीला गावातील युवकांनी ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील सह सायकलींग क्लबचे सदस्यांनी या युवकाला शुभेच्छा दिल्या.

तर बेळगाव शहरातील राणी चन्नम्मा चौकात बेळगाव जिल्हा पंचायत सिवा राहुल शिंदे यांनी देखील अनंत  धामणेकर यांच्या सायकल प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.