Friday, January 3, 2025

/

बेळगावची माय-लेकाच्या जोडी इंडिया बुक्स एशिया बुक्स ऑफ रेकॉर्डचा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : स्वीमर्स क्लब, बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांच्या वतीने १२ तासांच्या नॉन-स्टॉप जलतरण जोडी रिले लेगचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माय – लेकाच्या जोडीने विक्रम प्रस्थपित करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले आहे.

बेळगावमधील के एल इ सुवर्ण जलतरण तलावात या नॉन-स्टॉप जलतरण जोडी रिले लेगचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्योती कोरी आणि त्यांचा मुलगा विहान कोरी यांनी यश संपादित केले आहे. १२ तासांच्या या चॅलेंजमध्ये ज्योती कोरी यांनी १२ कि.मी. तर विहान कोरी याने १८ कि.मी. पोहण्याचा विक्रम केला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन स्विमर्स क्लब बेळगाव, एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव आणि सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव यांच्यासह केएलई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स काहेर, रोटरी क्लब ऑफ बेळगाव – एलिट, गोदाबाई चॅरिटेबल फाउंडेशन – संकेश्वर, श्री डीके मोटिव्ह, ए.के. बेळगाव यांच्या सहयोगाने करण्यात आले होते.

यासारख्या नियमित व्यायामामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी लक्षणीय फायदा होतो. नोकरदार महिला आणि गृहिणींमध्ये स्वतःसाठी वेळ काढणे आणि शारीरिक व्यायाम करणे याविषयी जागरूकता निर्माण करणे हा उद्देश ठेवून या लीगचे आयोजन करण्यात आले होते.Books

ज्योती एस. कोरी या 2000 पासून आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात प्रयोगशाळा तांत्रिक अधिकारी आहेत. त्यांनी वयाच्या 38 व्या वर्षी पोहायला सुरुवात केली आणि विविध राष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये सात वेळा भाग घेऊन एकूण 26 पदके जिंकली. . राज्यस्तरावर ५४ पदके आणि श्रीलंकेत झालेल्या निमंत्रित जलतरण चॅम्पियनशिपमध्ये ६ पदके जिंकली आहेत. तर सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये सहाव्या वर्गात शिकत असलेला त्यांचा मुलगा विहान एस. कोरी याने विविध राज्य आणि जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांमध्ये 22 पदके जिंकली आहेत.

हा कार्यक्रम एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या न्यायाधीश सुश्री रेखा सिंग यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आला होता. ज्योती कोरी आणि विहान कोरी यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल के एल इ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनसह जयंत हुंबरवाडी, अविनाश पोतदार, माणिक कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसने, प्रसाद तेंडोलकर आदींनी कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.