Tuesday, January 28, 2025

/

खड्ड्याने घेतला खानापूर येथे एकाचा बळी!

 belgaum

बेळगाव लाईव्ह: पावसात बेळगाव जिल्ह्यातील सर्वत्र रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अशा परिस्थितीत खानापूर तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्याने एका चालकाचा बळी गेला आहे.

नागरगाळी काटकोळ रस्त्यावरील हालसी इंदिरानगर जवळ पडलेल्या खड्ड्यात दुचाकी पडल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेत मयत झालेल्या दुचाकी स्वारकाचे नाव संतोष मादार वय 46 रा. मेरडा असे आहे.

गेल्या शनिवारी रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून नंदगड हून मेरडा गावाकडे जात असताना हलशी जवळ खड्ड्यात दुचाकीला अपघात झाल्याने गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्याना उपचारासाठी बेळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास मृत्यू झाला. त्याच्यावर आज मंगळवारी सकाळी 11 वाजता मेरडा मुक्कामी अंत्यसंस्कार होणार आहे.

 belgaum

असा झाला होता अपघात

मयत संतोष हा शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून मेरडा गावाकडे जात असताना नागरगाळी – कटकोळ या राज्य मार्गावरील हलसी इंदिरानगर कन्नड शाळेजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यात त्याची दुचाकी गेल्याने तो त्या खड्ड्यात कोसळला व त्याच्या डोकीला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुणीही नव्हते होते. त्यामुळे गंभीर अवस्थेत पडलेल्या संतोषला कोणीही पाहिले नाही. तो रक्तबंबाळ अवस्थेत रात्रभर त्याच ठिकाणी विव्हळत पडला होता. दरम्यान पहाटे चारच्या सुमारास एक वाहन त्या रस्त्याने जात असताना त्याला पाहिले त्यावेळी संतोष अपघातात जखमी झाल्याचे निदर्शनास आले त्याला तातडीने आरोग्य त्याला खानापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही व सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला

संतोष परशराम मादार हा एक प्रामाणिक चालक म्हणून परिचित होता, माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या वाहनांवर सतत गेली सात आठ वर्षे तो प्रामाणिकपणे सेवा कार्यरत होता. त्याच्या आकस्मिक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात वडील, पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे.Madar

*जीव घेणे खड्डे ठरताहेत अपघाताला कारणीभूत*

खानापूर तालुक्यात अनेक रस्ते हे जीव घेणे ठरले आहेत. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महामार्गापासून सार्वजनिक बांधकाम खाते तसेच जिल्हा पंचायत अगत्यात येणारे रस्ते ढसाळ झाले. नागरगाळी – कटकोळ या मार्गावरील नंदगड पर्यंत या रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी अनेक वेळा मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम खाते याकडे दुर्लक्षित आहे.

यासंदर्भात या भागातील नागरिकांनी अनेक वेळा आवाज उठूनही दुर्लक्ष झाले. त्यातच हा संतोष मादार यांचा झालेला अपघात त्याला कारणीभूत म्हणावा लागेल अशा या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या वर मनुष्यबळाचा गुन्हा का दाखल करू नये असा सवाल प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.