बेळगाव लाईव्ह : राजकारणासोबतच समाजकारणात देखील अग्रेसर असणारे समिती नेते, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी भाग्यनगर, अनगोळ येथील कल्याणी बसुर्तेकर नामक विद्यार्थिनीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे.
भाग्यनगर, अनगोळ येथील कल्याणी बसूर्तेकर आणि तिच्या बहिणींसाठी तर रमाकांत दादा त्यांची शैक्षणिक कारकीर्द घडवणारे जणू देवदूतच ठरले आहेत. कल्याणी हिला आणखी दोन बहिणी आहेत.
तिची मोठी बहीण इंजीनियरिंग अभ्यासक्रम शिकत असून कल्याणी स्वतः कायद्याचे (लॉ) शिक्षण घेत आहे. आपल्याला व आपल्या बहिणींना शिक्षण घेतेवेळी आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागले.
मात्र त्यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी मदतीला धावून जात आर्थिक मदत करून शिक्षणापासून वंचित होण्यापासून वाचवले आहे. रमाकांत कोंडुसकर यांनी केलेल्या या मदतीसाठी कल्याणी बसुर्तेकर आणि कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.