Thursday, January 9, 2025

/

दोन दुचाकींचा भीषण अपघात : दोन जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर अंतर्गत, खानापूर-गोवा रस्त्यावरील हेस्कॉम कार्यालया नजीक, जुन्या फिश मार्केट समोर, दोन दुचाकी एकमेकाला धडकल्याने दोघेजण जखमी झाले आहेत.

त्यामध्ये एका दुचाकी स्वराच्या पायाचे हाड मोडले असून, दुसऱ्या दुचाकी वर बसलेली कॉलेजची विद्यार्थिनी जखमी झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी एक दुचाकीस्वार खानापूर हुन रूमेवाडी क्रॉस च्या दिशेने निघाला होता. तर दुसरा दुचाकीस्वार खानापूर शहरातील नींगापूर गल्ली कडून आपल्या गावी जाण्यासाठी, दुचाकीवरून, आपल्या कॉलेजला आलेल्या मुलीला घेऊन निघाला होता.Ganesh advt 2024

परंतु रुमेवाडी क्रॉस कडे निघालेल्या दुचाकी स्वराचे लक्ष नसल्याने, त्याच्या दुचाकीची धडक निंगापूर गल्लीतून आलेल्या दुचाकीला बसली. व दोन्ही दुचाकी खाली पडल्या, त्यामुळे सिंगल सीट असलेल्या युवकाच्या पायाचे गुडघ्याखालील हाड मोडले आहे.

त्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दुचाकी वर बसलेल्या मुलीच्याच्या पायालाही गंभीर दुखापत झाली असल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.Ganesh advt 2024

गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी नागरिकांची‌ मोठी गर्दी खानापूर शहरात झाली आहे. त्यामुळे अपघात होताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. गणेश चतुर्थीचा सण असल्याने प्रत्येक जण आपल्या घाई गडबडीत आहेत. या घाईगडबडीतच हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे मत आहे.Ganesh advt 2024

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.