बेळगाव लाईव्ह :बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्य सेनानी व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार मंच गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) यांच्यावतीने बुधवार दि. 2 ऑक्टोबर 2024 रोजी महात्मा ‘गांधी विचार गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.
ज्योती महाविद्यालय क्लब रोड, बेळगाव येथे येत्या बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता हा सत्कार समारंभ होणार आहे.
या समारंभात कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते कॉ. कृष्णा मेणसे यांना पुरस्कार प्रदान केला जाईल.
तरी सदर समारंभात खासदार छ. शाहू महाराज यांच्या स्वागतासाठी सीमा भागातील मराठी जनता तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर व प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.