बेळगाव लाईव्ह : वाहतुकीचे नियम हे केवळ दंडात्मक कारवाईसाठी नसतात. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी, प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे नियम लागू केले जातात.
मात्र सर्रास या नियमांचे पालन करताना कुणीच दिसत नाही. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याऐवजी नियमभंग करण्यातच अनेक नागरिक धन्यता मानतात. अशातूनच पुढे अपघात घडतात.
मात्र यावेळी ना वेळ आपल्या हातात असते ना आपल्यावरचा धोका टळलेला असतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दंडांमध्ये सरकारने अनेक कठोर बदल केले आहेत.
परंतु तरीही नागरिक मात्र याकडे दुर्लक्षच करताना आढळून येत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात बेळगाव शहरात चुकीच्या बाजूने वाहन चालवण्याची एकूण 222 प्रकरणे समोर आली आहेत.
ही चिंताजनक आकडेवारी असून, वाढत्या अपघातांच्या संख्या लक्षात घेतात प्रत्येक वाहन चालकाने अशा पद्धतीने वाहतुकीच्या नियमांचा भंग करणे टाळावे आणि स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.