Monday, December 23, 2024

/

कपडे धुवायला गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

 belgaum

बेळगाव लाईव्ह : खादरवाडी येथील धरणामध्ये कपडे धुवायला गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास हि घटना घडली असून आसपास कुणीही नसल्याने हि बाब लवकर निदर्शनात न आल्याची माहिती मिळाली आहे.

सुनीता सोमनाथ पाटील (वय ५०) असे दुर्दैवी महिलेचे नाव असून या महिलेच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. या घटनेची अधिक माहिती अशी कि, सदर महिला कपडे धुवायला एकटीच गेली होती. आजूबाजूला कोणी नव्हतं त्यामुळे ही दुर्घटना घडली अशी गावात चर्चा आहे.Khadarwadi

बराच वेळ उलटल्या नंतर धरणाच्या बाजूला जनावरे चारणाऱ्या मुलांनी तो मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी धरणाकडे धाव घेतली आणि घटनेची माहिती तातडीने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाला कळविली.

तातडीने ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.