Saturday, January 25, 2025

/

ब्रागंझा घाटात सोनालीम, दूधसागर दरम्यान रुळावरून घसरली मालगाडी

 belgaum

बेळगाव लाईव्ह: शुक्रवारी सकाळी 09:35 वाजता, नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील ब्रागांझा घाट प्रदेशातील सोनालीम आणि दूधसागर रेल्वे स्थानकांदरम्यान 17 लोड केलेल्या वॅगनसह मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी 9:35 वाजण्याच्या सुमारास घडली.

मालगाडी रुळावरून घसरण्याच्या या घटनेमुळे पुढील प्रमाणे रेल्वे गाड्या वळवल्या/रद्द केल्या आहेत. वळवलेल्या रेल्वे गाड्या : 1) रेल्वे क्र. 17420/17022 वास्को द गामा – तिरुपती /हैदराबाद साप्ताहिक एक्स्प्रेसचा 09.08.2024 रोजी सुरू झालेला प्रवास मडगाव, कारवार, पडील, सुब्रमण्य रोड, हासन, अर्सिकेरे, चीकजाजूर, रायादुर्ग आणि बळ्ळारी मार्गे वळवण्यात आला आहे, पुढे ही रेल्वे आपला नियमित मार्ग सुरू ठेवेल.

2) रेल्वे क्र. 12779 वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा 09.08.2024 रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव, रोहा, पनवेल, कल्याण आणि पुणे मार्गे वळवण्यात आला आहे, पुढे ही रेल्वे आपला नियमित मार्ग सुरू ठेवेल. 3) रेल्वे क्र. 12780 हजरत निजामुद्दीन – वास्को दा गामा एक्स्प्रेस, 08.08.2024 रोजी सुरू झालेला प्रवास पुणे, कल्याण, पनवेल, रोहा आणि मडगाव मार्गे वळवण्यात आला आहे. पुढे ही ट्रेन आपला नियमित मार्ग सुरू ठेवेल.

 belgaum

रद्द झालेल्या रेल्वे गाड्या : 1) रेल्वे क्र. 17309 यशवंतपूर – वास्को द गामा, 09.08.2024 रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे. 2) रेल्वे क्र. 17310 वास्को द गामा – यशवंतपूर, 09.08.2024 रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.Train

दरम्यान, रेल्वे मालगाडी रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच वास्को द गामा आणि हुबळी येथून 140 टन क्रेन आणि इतर आवश्यक सामग्रीसह अपघात निवारण रेल्वे मदत कार्यासाठी घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव, अतिरिक्त महाव्यवस्थापक के एस जैन आणि विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

हुबळीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हर्ष खरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी मदत कामांच्या देखरेखीसाठी मालगाडी रुळावरून घसरलेल्या ठिकाणी दाखल झाले आहेत. रेल्वे सेवेतील अन्य कोणत्याही बदलाची सूचना नंतर केली जाईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.