बेळगाव लाईव्ह:बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार मनोहर किणेकर, कार्याध्यक्षपदी आर. एम. चौगुले व संतोष मंडलिक, तर सरचिटणीसपदी ॲड. एम. जी. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मराठा मंदिर येथे आज गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये बेळगाव तालुका म. ए. समितीच्या उपरोक्त पदाधिकाऱ्यांसह नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष -माजी आमदार मनोहर किणेकर. कार्याध्यक्ष -आर. एम. चौगुले, संतोष मंडलिक. सरचिटणीस -ॲड. एम. जी. पाटील, सहचिटणीस -मनोहर संताजी, मल्लाप्पा गुरव. उपाध्यक्ष -रामचंद्र मोदगेकर, विठ्ठल पाटील, लक्ष्मण होणगेकर, मोनाप्पा पाटील. खजिनदार -मल्लाप्पा पाटील, आर. के. पाटील.
प्रवक्ता -, डी. बी. पाटील पियूष हावळ. महिला आघाडी -प्रेमा मोरे, कमल मंडोळकर, वैष्णवी मुळीक. युवा आघाडी – राजू कीणयेकर, अंकुश पाटील, किसन लाळगे, मनोहर हुंदरे, मयूर बसरीकट्टी, किरण पाटील व रोहित गोमानाचे.
नूतन कार्यकारणी जाहीर केल्यानंतर अध्यक्ष या नात्याने बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासह मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी तसेच सीमाप्रश्नासह शेतकरी, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी संघटित राहुन समितीची संघटना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.