Thursday, November 7, 2024

/

या’ डोंबारी कॉलनीला राज्य महिला आयोग अध्यक्षांची भेट

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहरालगतच्या हिंडलगा रोडवरील बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीतील डोंबारी कॉलनीला आज मंगळवारी सकाळी भेट देऊन कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डाॅ. नागलक्ष्मी चौधरी यांनी तेथील असुविधांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

डोंबारी कॉलनीतील मूलभूत सुविधांच्या अभावांबद्दल संताप व्यक्त करून कॉलनीतील रहिवाशांना तात्काळ आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली. या ठिकाणी दररोज व्यवस्थित पाणी पुरवठा केला जावा. येथील मुलांना शिक्षणासाठी कन्नड शाळेमध्ये दाखल करण्याच्या दृष्टीने क्रम हाती घेतले जावेत. तसेच पियूसी अर्थात पदवीपूर्व अभ्यासक्रमानंतर पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि पीयूसी अभ्यासक्रम अर्धवट सोडलेल्या मुला -मुलींची यादी तयार करावी अशी सूचनाही डाॅ. नागलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना केली.

आवश्यक नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आरोग्य खात्याने डोंबारी कॉलनीतील रहिवाशांची नियमित आरोग्य तपासणी करावी. सामाजिक सुरक्षातता योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना शोधून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पडले तरच जनतेला सरकारी सुविधांचा लाभ मिळणे शक्य आहे. हे लक्षात ठेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले काम चोख बजावावे, असे निर्देश डाॅ. नागलक्ष्मी चौधरी यांनी दिले. याप्रसंगी समाज कल्याण खात्याचे संचालक रामनगौडा कन्नोळ्ळी, महिला व बाल कल्याण खात्याचे उपसंचालक नागराजु यांच्यासह आरोग्य, ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.Women president

महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ.नागलक्ष्मी चौधरी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा रुग्णालय आणि बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेला आज कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ.नागलक्ष्मी चौधरी यांनी भेट देऊन रुग्ण व जनतेच्या सोयीसाठी शुद्ध पिण्याचे पाणी व पथदिव्यांची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

बेळगाव जिल्हा रुग्णालय आणि बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेला डॉ.नागलक्ष्मी चौधरी यांनी भेट देऊन पायाभूत सुविधांची पाहणी केली. पिण्याचे शुद्ध पाणी, पथदिव्यांची व्यवस्था,; बाह्यरुग्ण विभागात स्वच्छतागृहाची सोय करावी, कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांसाठी सुसज्ज विश्रामगृह उपलब्ध करून द्यावे, याशिवाय महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्यपणे बसवावेत, असे डॉ.नागलक्ष्मी यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित असलेले बिम्सचे संचालक अशोक शेट्टी यांनी संस्थेची माहिती दिली. यावेळी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.महेश कोणी, महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक नागराजा, आरोग्य विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.