बेळगाव लाईव्ह :बेळगाव उत्तर तालुक्याची निर्मिती माझ्या हातात नाही ते करायचे की नाही हे सरकारने ठरवायचे आहे, असे मत मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले होते.बेळगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
बेळगाव उत्तर तालुका निर्माण करणे माझ्या हातात नाही याबाबतचा सरकारने निर्णय घ्यायचा आहे. सध्या बेळगाव शहराची तालुक्याची लोकसंख्या 8 लाख आहे त्यातच बेळगाव जिल्ह्याचे विभाजन देखील होणार आहे त्यामुळे थोडी वाट पहावी लागेल, आम्हीही याबाबतीत सरकारवर दबाव आणत आहोत असं जारकीहोळी यांनी म्हटलं आहे.
मंत्री जारकीहोळी म्हणाले की, राज्यातील सर्व विभागांना अनुदान वाटप करण्यात आले आहे, शिक्षण, रोजगार या विषयांना उच्च प्राधान्य देण्यात आले असून चार वर्षे आमचे सरकार कायम राहणार आहे.
ते म्हणाले की, ते बेळगाव जिल्ह्यात नवीन कॅन्सर हॉस्पिटलसाठी जागा शोधत आहेत, ते 30 एकर जागेवर बांधणार आहेत, बेळगाव मल्टी हॉस्पिटलचे लवकरच उद्घाटन होणार आहे, आणि ते कर्मचारी नियुक्त करत आहेत.नंदगड येथील संगोळी रायण्णा समाधीचा विकास करण्यासाठी एक समिती असून ते ती करेल, खानापुर येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटनही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.राज्यात काँग्रेसच्या हमीभावाच्या योजना उभ्या राहणार नाहीत यात शंका नाही, जोपर्यंत सरकार आहे त्यांच्यासाठी हमीभाव आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तत्पूर्वी पोलीस खात्याच्या वतीने सतीश जारकीहोळी आणि आमदार राजू सेठ यांच्या हस्ते हेल्मेट वितरित करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या वतीने दुचाकी रॅली देखील करण्यात आली त्या रॅलीत सतीश जारकेवाडी यांनी दुचाकीवर स्वार झाले होते जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांच्या दुचाकी वर पालकमंत्री बसले होते.
यावेळी बुडाध्यक्ष लक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त मार्टिन, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, आमदार आसिफ शेठ आदी उपस्थित होते.