Wednesday, January 15, 2025

/

इस्कॉन मंदिरातील सोमवार मंगळवारचे कार्यक्रम

 belgaum

बेळगाव लाईव्ह – बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनांमृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त सोमवार व मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

*26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी*
सोमवार दि. 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीनिमित्त पहाटे 4.30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, अभिषेक, नाट्यलीला आदी कार्यक्रम होणार आहेत. पपू भक्तीरसामृत स्वामी महाराज श्रीकृष्ण जन्माची कथा सांगणार आहेत .त्यानंतर रात्री सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे.
*27 रोजी श्रील प्रभूपाद व्यासपूजा महोत्सव*
जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी इस्कॉनचे संस्थापक आचार्य प.पू.श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस असल्याने तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्त मंदिरात सकाळी दहा वाजता श्रीद प्रभुपाद गौरव, साडेअकरा वाजता अभिषेक, साडेबारा वाजता पुष्पांजली व गुरुवंदना आदि कार्यक्रम होणार असून प्रभुपाद यांच्या जीवनावर अनेक भक्तांची भाषणे होतील. तसेच भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन होईल .त्यानंतर दुपारी सर्वांसाठी महाप्रसाद होईल. या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि कृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन बेळगाव तर्फे करण्यात आले आहे.

Bhakti rasamrit maharaj
इस्कॉन आयोजित श्रीकृष्ण कथा महोत्सवाचा समारोप*

बेळगाव -श्रीकृष्ण कथा महोत्सवातील पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी इस्कॉन चे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी भगवंतांच्या तीन विवाहांची माहिती दिली . कौशल देशाचा राजा नग्नजीत यांची कन्या सत्या जिला नग्नाजीती असेही म्हटले जायचे तिच्याबरोबर विवाह केला. ज्यावेळीला भगवान श्रीकृष्ण कौशल राज्यात गेले त्यावेळेला त्यावेळी नग्नजीत महाराज सत्या देवीचा विवाह अशा व्यक्तीबरोबर करणार होते की जी व्यक्ती त्यांच्या 7 बैलांना (सांड) वश करून नियंत्रण आणतील त्यांच्याशी सत्या विवाह करणार आहे. ही अट ऐकून तिथे आलेल्या अनेक राज्यानी प्रयत्न केला. पण ते सर्व त्या बैलांना वश करायला असमर्थ ठरले. तेव्हा श्रीकृष्णांनी आपले रूप सात रूपात विस्तारित केले आणि अगदी सहजरीत्या त्या 7 बैलांना वश केले. सत्यादेवीची ही इच्छा भगवंताबरोबरच विवाह करण्याची होती. त्यामुळे नग्नजीत महाराजांनी मोठ्या आनंदाने सत्याचा विवाह भगवंतांच्या बरोबर केला .त्यावेळी येथे आनंदोत्सव साजरा झाला. हजारो गाई ,रथ ,हत्ती, सेविका, धनधान्य , मौल्यवान उपहार देऊन नग्नजीत महाराजांनी आपल्या कन्येची आनंदाने बिदाई केली. अशाप्रकारे भगवंताची सहावी राणी म्हणून सत्या घरी आली. त्यानंतर शूतकीर्तीची कन्या भद्रा हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर लक्ष्मणा हिच्याबरोबर आठवा विवाह झाला. अशा प्रकारे एकूण आठ राण्यांशी विवाह करून भगवान श्रीकृष्णानी त्यांना मथूरेत आणले.

*सहाव्या दिवशी कृष्ण कथानकाचा समारोप*
यावर्षीच्या श्रीकृष्ण कथानाथाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी भगवंतांच्या 16100 राण्यांबरोबर झालेल्या विवाहाची कथा सांगितली.भौमासुर म्हणजेच नरकासुर आणि मूर यांचे अनन्वित अत्याचार वाढले होते. भौमासुराने वेगवेगळे ऋषीमुनी, वेगवेगळ्या देवता, वेगवेगळ्या असूर आणि वेगवेगळ्या राजांच्या कन्या जबरदस्तीने आणून बंदीवासात ठेवल्या होत्या. त्यांची संख्या होती 16100. ज्या वेळेला श्रीकृष्णांना हे समजले तेव्हा त्यांनी नरकासुराबरोबर युद्ध केले आणि नरक चतुर्दशी दिवशी त्याचा वध केला. त्या 16100 राण्यांना त्यांनी द्वारकेला पाठवले. त्यांच्यासोबत प्रचंड धनदौलत सुद्धा त्यांना देण्यात आली. द्वारकेला येऊन भगवंतांनी एकाच वेळी एकाच मुहूर्तावर त्या 16100 राण्यांच्या बरोबर विवाह केला. त्यांच्यासोबत त्यांचा सर्व परिवार प्रत्येक ठिकाणी उपस्थित होता. प्रत्यक्ष रूपाने भगवान श्रीकृष्ण प्रत्येक राजमहालात होते आणि तेही त्यांच्या मूळ रूपात. ही आहे भगवंताची अद्भुत शक्ती. त्यांचे कार्य तर्क करण्यापलीकडचे आहे. भगवंत त्या प्रत्येक राणीसोबत प्रत्येक महालात अनेक वर्षे राहिले. साधारण मनुष्य प्रमाणेच त्यांनी तेथे व्यवहार केला. एक आदर्श गृहस्थ कसा राहू शकतो हे त्यांनी द्वारकेत राहून दाखवून दिले. अशा प्रकारे भगवंतांच्या 16,108 राण्या झाल्या असे सांगून भक्तीरसामृत स्वामी महाराजांनी श्रीमद् भागवताच्या दहाव्या स्कंदातील 58 व्या अध्यायाची सांगता केली.यावर्षी भगवान श्रीकृष्णांच्या विवाहाबाबतीत ची माहिती ऐकून उपस्थित असलेले हजारो भक्तगण आनंदी झाले.
दरम्यान सत्यभामा राणीच्या इच्छेखातर त्यांनी स्वर्गातून पारिजात वृक्ष आणला तो आणण्यासाठी त्यांना इंद्राबरोबर युद्ध करावे लागले .त्या युद्धात इंद्राचा पराभव झाला आणि तो पारिजात वृक्ष आणून भगवान श्रीकृष्णानी आपल्या पत्नीच्या महालासमोर लावला अशी ही माहिती महाराजांनी यावेळी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.