Sunday, November 24, 2024

/

गरिबीने तो…दोन म्हशी विकून उपचारासाठी झाला दाखल

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मधुमेहामुळे गेल्या ४ दिवसांपासून प्रकृती बिघडलेल्या रुग्णास रुग्णालयात उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने माजी महापौर सह एपीएमसी माजी अध्यक्षाने बिम्स प्रशासनाची हजेरी घेताच त्यांच्या उपचारासाठी दखल करून घेतल्याची घटना घडली आहे.

कन्नड सक्ती आंदोलनातील  हुतात्म्याचा वारस असलेला आणि या अगोदर बेळगावातील एका वर्तमान पत्राच्या कार्यालयात काम केलेल्या बेळगुंदी येथील शटूप्पा चव्हाण गरिबीने आपल्या घरातील दोन म्हशी विकून उपचार घेण्यासाठी इस्पितळात दाखल झाले आहेत.

मधुमेहामुळे गेल्या ४ दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने शट्टूप्पा चव्हाण हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज असून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

शट्टूप्पा चव्हाण हे स्थानिक पातळीवर उपचार घेत होते. मात्र मधुमेहामुळे त्यांच्या पायात पस भरल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराचा फटका त्यांना बसला. यावेळी शट्टूप्पा चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करून उपचार देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली.Belgundi chavan

दरम्यान माजी महापौर शिवाजी सुंठकर, ए पी एम सी चे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, सुळगा ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष संजय पाटील  यांनी हस्तक्षेप करून संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला. मात्र याठिकाणी असलेले डॉ. अजित वांद्रे यांनी फोनवरून अरेरावीची भाषा केल्याने संतापलेल्या शिवाजी सुंठकर यांच्यासह आणखी काही नागरिकांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी डॉ. अजित वांद्रे आणि येथील एकंदर परिस्थिती पाहून उपस्थित कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर थेट बीम्सच्या वैद्यकीय संचालकांशी संपर्क साधण्यात आला. यावेळी त्यांनी दिलेल्या सूचनेनंतर शट्टूप्पा चव्हाण यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
शट्टूप्पा चव्हाण यांनी उपचारासाठी दाखल होण्यापूर्वी आपल्या घरातील दोन जनावरे यथास्थिती विक्री केली आहेत.

6जून 1986 रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हुतात्मा पत्करलेले बेळगुंदी येथील  कै. भावकु चव्हाण यांचा चिरंजीव असलेले शट्टूप्पा चव्हाण हे स्थानिक वृत्तपत्र कार्यालयात काम करीत होते. प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या या पत्रकाराचे कुटुंब देखील आर्थिक अडचणीत भरडले जात असून बेळगाव जिल्हा रुग्णालयात त्यांची आणखीनच हेळसांड होत आहे. हि एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य योजना पोहोचवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मंडळींनी याकडे मुद्दाम डोळेझाक केली आहे का? श्रेय वादाच्या लढाईत अडकलेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात हे अंजन आहे कारण त्यांना हुतात्म्यांचे वारसही दिसत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे केवळ चमकोगिरीत अडकलेल्या साठी ही इशाऱ्याची घंटी आहे.

आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांनी

CANARA BANK,

Account No:2912101006116

NAME(S) ;SHATTUPPA BHAVAKU CHAVAN
Mobile:91948039818

Address :51 LA KALMESHWAR GALLI,BELGUNDI BELGUNDI,BELAGAVI-591108-KARNATAKA-INDIA
PIN/ZIP number: 591108

CANARA BANK, NO 332, SCHEME 40,5AI PLAZA OPP:BUDA COMPLEX
IIANUMAN NAGAR
BELGAUM KARNATAKA-590001

IFSC Code: CNRB0002912 MICR Code: 590015010

Foreign Exchange/SWIFT Code: CNRBINBBBFD

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.