Saturday, November 23, 2024

/

भर रस्त्यात झालेल्या खुनाने हादरले कर्ले

 belgaum

बेळगाव लाईव्ह:कर्ले त एकाचा भर रस्त्यात निर्घृण खून झाल्याची घटना सोमवार दि.19 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मृताचे नाव मोहन गिद्दु तरवाळ वय 55 असे आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार
कर्ले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य असलेले मोहन तलवार हे सोमवारी दुपारी किणये येथून कर्ले च्या दिशेने दुचाकीवरून येत होते. त्यावेळी अनोळखी हल्लेखोरांनी मोहन यांच्यावर धारधार शस्त्रांनी मानेवर वार केल्याने भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

त्यावेळी काही जणांनी या घटनेची माहिती पोलिसांना व मोहन यांच्या घरी सांगितल्याने घराच्या सदस्यांनी त्या ठिकाणी येऊन गंभीर जखमी मोहन यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र घाव वर्मी बसल्याने संध्याकाळी 5 च्या सुमाराला निधन झाले.Karle murder

हा हल्ला कोणी केला व कशासाठी केला याचा तपास बेळगांव ग्रामीण पोलीस करत आहेत. ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. घटनेनंतर या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. सोमवारी रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मयत मोहन यांची कुणाशी वैरी होती का? तुमच्यावर हल्ला होण्याचे नेमकं कारण काय? हा जीवघेणा कुणी केला असावा? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.