बेळगाव लाईव्ह : अतिवृष्टीमुळे ओढवलेली पूर परिस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी बेळगावच्या दौऱ्यावर येणार आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील कृष्णा आणि घटप्रभा नदीकाठावरील अनेक गावातील पूर्वपरिस्थितीची पाहणी ते करणार असून बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच जिल्ह्यातील विविध विभागाचे मंत्री आणि अधिकारीदेखील या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.
सोमवारी सकाळी ११ वाजता ते सांबरा विमानतळावर पोहोचणार असून तिथून पुढे गोकाक शहरातील विविध ठिकाणच्या पूरग्रस्त भागांची पाहणी करून तेथील काळजी केंद्राला भेट देणार आहेत.
त्यानंतर कागवाड तालुक्यातील जुगुळ आणि त्यानंतर चिक्कोडी येथील मांजरी भागाला भेट देणार आहेत. या सर्व पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर पुन्हा बेळगावमधील सर्किट हाऊस येथे पोहोचून रात्री बेंगळुरूला रवाना होणार आहेत.