बेळगाव लाईव्ह :भारतामध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणारा रक्षाबंधन सण म्हणजे संरक्षणाचा धागा, जो भाऊ आणि बहिणींमधील चिरस्थायी बंधाचे प्रतीक आहे. परंपरा आणि सौहार्द यांचे हृदयस्पर्शी प्रदर्शन करत मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या सर्व श्रेणीतील अधिकारी व जवानांनी आज रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
सदर रक्षाबंधन कार्यक्रमांमध्ये 200 हून अधिक शाळकरी मुली, इनरव्हीलसह विविध स्वयंसेवी संस्थांमधील महिला आणि सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या पत्नींनी बंधूसमान तरुण अग्निवीरांना राख्या बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता.
मराठा लाईट इन्फंट्रीच्या अग्निविरांसह अधिकारी व जवानांनी मोठ्या अभिमानाने आणि नम्रतेने राख्या स्वीकारल्या. त्यांनी पुढे मातृभूमीची सेवा करण्याची आणि तिच्या सीमा व नागरिकांचे अंतर्गत किंवा बाह्य सर्व धोक्यांपासून रक्षण करण्याची शपथही घेतली.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचा (एमएलआयआरसी) हा रक्षाबंधनाचा उत्सव भारतीय लष्कराची सांस्कृतिक परंपरांचे पालन आणि संवर्धन करण्याची वचनबद्धता अधोरेखित करत होता.
आपले सण आलिंगन देत साजरे करून सैन्य आपल्या श्रेणींमध्ये आणि नागरिकांमध्ये एकतेची व जागरूकतेची भावना वाढवते हे विशेष होय.