बेळगाव लाईव्ह:काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, बेळगाव जिल्हा हा एकेकाळी सध्याच्या महाराष्ट्र आणि तत्कालीन मुंबई राज्यात होता. असे वक्तव्य राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले. मुंबईतील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
महात्मा गांधीजी 1924 मध्ये जेंव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तेंव्हा त्यांनी ते अध्यक्षपद बेळगावमध्येच स्वीकारलं होतं. या पद्धतीने गांधीजी एकदाच अध्यक्ष झाले ते देखील महाराष्ट्रात असलेल्या बेळगावमध्ये जे आता कर्नाटकात आहे. त्यामुळे गांधीजी आमच्याकडे पण येऊन गेले आहेत असे आम्ही कर्नाटकवाले सांगत असतो असेही ते म्हणाले.
पुढे त्यांनी या पद्धतीने महाराष्ट्राचा इतिहास आहे, फार मोठा इतिहास आहे. राजकीय, सामाजिक कोणतेही क्षेत्र असो महाराष्ट्राच्या लोकांनी कार्य केलेले आहे आणि इतरांना मदत करण्याची भावना या ठिकाणी आहे.
कोणताही बेरोजगार माणूस मुंबईला गेला तर उपाशी राहत नाही असे म्हंटले जाते. म्हणूनच मुंबई इतकी मोठी आहे की माझ्या मते येथील लोकसंख्या जवळपास 2 कोटींच्या जवळपास असेल असेही त्यांनी म्हटलं आहे.
इतक्या प्रचंड संख्येने विभिन्न भाषा, जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन स्थायिक झाले आहेत. हे सर्वजण देशासाठीही काम करत असून महाराष्ट्र प्रामुख्याने देशाची आर्थिक परिस्थिती उंचावत ठेवण्याचे काम करत आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले.