Tuesday, January 28, 2025

/

आंतरराज्य चोराला माळमारुती पोलिसांकडून अटक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहर परिसरात घडत असलेल्या चोरीच्या वाढत्या घटनांना अनुसरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच चोरीच्या घटनेतील आरोपींना अटक करण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार तपासाची गती वाढवत माळमारुती पोलिसांनी एका आंतरराज्य पातळीवरील चोराला अटक केली आहे.

आपल्या मित्रांसह लक्झरी कारमधून प्रवास करताना संशय आल्याने अधिक तपास केला असता आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली असून त्याचे अन्य साथीदार फरार झाले आहेत.

नागराज सुभाष कचेरी कमलापूर, रा. गुलबर्गा (उर्फ नवीन गरकुल कुंभारी, रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपच नाव आहे. पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता त्याने आपण केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

 belgaum

आपल्या मित्रांसह कारमधून फिरणाऱ्या नागराजने कारवर प्रेस (PRESS) असे लिहिले होते. दरम्यान याबाबत अधिक चौकशी करण्यात आली असता संशयास्पद गोष्टी आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान सदर आरोपीने बेळगावमधील महांतेश नगर, अंजनेय नगर व शिवबसव नगर येथे अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.Theft

चौकशीअंती आरोपीकडून १० लाख रुपये किमतीचे सोने व एक एक्सयूव्ही कार असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीसोबत चोरीच्या घटनांमध्ये सामील असलेले हुसेन उर्फ सागर गायकवाड, अमूल आणि केत्या हे आरोपीचे मित्र सध्या फरार असून या तिघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हि कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी सोमगौडा यु. यांच्या मार्गदर्शनाखाली जयम काली मिरची यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय होन्नाप्पा तळवार, पीएसआय श्रीशैल हुळगेरी, कर्मचारी एम. जी. कुबेर, चिन्नाप्पागोळ, बसू बस्त, चंद्रू चिगरी, के. बी. गौरानी, होसमनी, रवी बारीकर, मुजावर, शिवाजी चौहान, मारुती मादर, मल्लिकार्जुन गाडवी, जगन्नाथ भोसले, बसवराज कल्लाप्पण्णावर, महादेव काशीद या पथकाचा या कारवाईत सहभाग होता. या कारवाईचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग यांनी कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.