Sunday, November 24, 2024

/

बेळगावातील चोरीच्या घटना : इराणी टोळी सक्रिय होण्याची भीती

 belgaum

बेळगाव  लाईव्ह :बेळगावमध्ये गेल्या महिनाभरात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून खासबाग आणि टिळकवाडी परिसरात चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. या त्रासदायक प्रवृत्तीव्दारे एकट्या दुकट्या महिलांना लक्ष्य करून लुटले जात असून कुख्यात इराणी टोळी शहरात पुन्हा एकदा सक्रिय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काल शुक्रवारी झालेल्या चोरीमुळे चिंता आणखी वाढली आहे. बाजार गल्ली वडगाव येथे घडलेल्या कालच्या घटनेत लक्ष्मीपुजनाला जाऊन आपल्या घरासमोर दुचाकी उभी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व इतर दागिने असे एकूण 70 ग्रॅमचे दागिने मोटरसायकल वरून पाठलाग करत आलेल्या एका भामट्याने लंपास केले. महिलेने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक जमा झाले.

मात्र तोपर्यंत भामट्याने तेथून पळ काढला होता. या पद्धतीने दागिने लांबवणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे. या चोरीच्या घटनेत सहभागी असलेल्या टोळ्या गोव्यात पळून गेल्या असून सध्या लपून बसल्या असल्याची गुप्तचर विभागाची माहिती आहे.Theft logo graphics

सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून आणि मोटर सायकलचा नंबर आधीच मिळाला असला तरीही संशयितांचे वाहन त्याच्या मॉडेल आणि रंगाच्या आधारे ओळखण्यासाठी पोलीस अधिकारी सक्रियपणे धाग्यादोऱ्यांचा पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) सहकार्य लाभत आहे.

बेळगाव शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बनियांग यांनी पोलिस विभाग चोरांना पकडण्यासाठी कठोर पावले उचलत आहे, असा दिलासा रहिवाशांना दिला आहे.

चोरीच्या घटनेचे साक्षीदार किंवा अनुभव असल्यांनी त्वरित 112 क्रमांकावर फोन करून घटनेची तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बेळगाव पोलिसांनी तपासाचा वेग वाढविल्यामुळे गुन्हेगारीच्या या अस्वस्थ लाटेचे जलद निराकरण होईल या आशेवर रहिवासी सतर्क झाले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.