Sunday, November 17, 2024

/

.. 12 तास उलटले तरी ‘तो’ कारखाना धगधगता!; एकाचा दुर्दैवी मृत्यू

 belgaum

बेळगाव लाईव्ह :नावगे क्रॉस नजीकच्या स्नेहम इंटरनॅशनल या कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. ही आग इतकी भीषण होती की आज बुधवारी सकाळी 12 तास उलटून गेले तरी धुमसत असलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरूच होता. या दुर्घटनेत तीन कामगार गंभीर जखमी झाले असून दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी कामगाराचे नांव यल्लाप्पाFire गुंड्यान्नावर (वय 19, रा. मार्कंडेयनगर बेळगाव) असे तर गंभीर जखमींची नावे मारुती करवेकर (वय 32), यल्लाप्पा सालगुडे (वय 35) आणि रणजीत पाटील (वय 39) अशी आहेत.

बेळगाव जांबोटी रस्त्यावरील नावगे क्रॉस येथे असलेल्या स्नेहम इंटरनॅशनल या प्लास्टिक चिकटपट्ट्यांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याला काल मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटने लागलेल्या या आगीने अल्पावधीत रौद्ररूप धारण करून संपूर्ण कारखान्याला आपल्या विळख्यात घेतले. ही आग इतकी भयानक होती की 1 कि.मी. अंतरावरून आगेचे लोळ दिसत होते. आगेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस आणि अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत कार्यासह आग विझवण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. काही वेळात एसडीआरएफचे बचाव पथकही त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी खिडकीची तावदाने (काचा) तोडून आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारीही त्वरेने घटनास्थळी दाखल झाले. हे अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी ठाण मांडून परिस्थिती हाताळत होते.Fire

स्नेहा इंटरनॅशनल कारखान्याला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने आज बुधवारी सकाळी 9:30 वाजता घटनास्थळी भेट दिली असता 12 तास उलटून गेले तरी आग पूर्णपणे आटोक्यात आली नसल्याचे दिसून येत होते.Fire

काल रात्रीपासून बाहेरून पाण्याची फवारणी करून आग विझवण्याचा अथक प्रयत्न करणाऱ्या अग्निशामक दलाचे जवान आज सकाळी देखील बेचिराख झालेल्या कारखान्याच्या आतील बाजूस जाऊन धुमसणारी आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. यासाठी जेसीबीच्या सहाय्याने जळणारी लाकडे व इतर साहित्य बाजूला सारण्यात येत होते. आग लागली त्यावेळी सदर कारखान्यात 160 कामगार होते. त्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले सांगण्यात आले असले तरी सदर घटनेत तिघेजण गंभीर जखमी तर एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

मृत्युमुखी पडलेला कामगार दुर्दैवाने लिफ्टमध्ये अडकून पडला होता. जीव वाचवण्यासाठी कोणताच मार्ग नसल्यामुळे त्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. दरम्यान लिफ्टमध्ये एक कामगार अडकल्याच्या संशय येताच एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून मेटल कटरच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा कापून दुर्दैवी यल्लाप्पा गुंड्यान्नावर या युवा कामगाराला बाहेर काढले मात्र तोपर्यंत तो गतप्राण झाला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.