बेळगाव लाईव्ह: इंजिनियरिंगच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करून प्रथम श्रेणीत गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या एका होतकरू तरुणाचा अकाली झालेला अस्त समाजाला चटका लावणारा ठरला आहे.
मूळचे राजहंस गड येथील सध्या आनंद नगर वडगाव येथे वास्तव्यास असलेले पत्रकार महादेव पवार यांचे चिरंजीव विघ्नेश पवार वय 21 यांचे आजाराने निधन झाले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन विभागात घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची ही अचानक झालेली एक्झिट धक्कादायक ठरली आहे. विघ्नेश याने इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन शाखेच्या सहाव्या सेमिस्टर अंतिम परीक्षेमध्ये विघ्नेश पवार हा 98.5 टक्के गुण संपादन करून प्रथम श्रेणीसह गुणवत्तेत उत्तीर्ण झाला होता. या परीक्षेतील यशाने पवार कुटुंबीय सुखावले होते सोनेरी स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस हाता तोंडाशी आले असताना विघ्नेशचे हे जाणे पवार कुटुंबीयांवर आघात करणारे ठरले आहे.
एक मुलगा एक मुलगी पती पत्नी अश्या चौकोनी कुटुंबातील विघ्नेश सारखा हुशार आणि यश पादक्रांत केलेला तरुण मुठीतील वाळू सुटून जावी तसा निघून गेला की समाजासाठी सुद्धा दुर्दैवी गोष्ट ठरली आहे.
बेळगावातील एका खाजगी इस्पितळात त्याने शनिवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला रविवारी दुपारी राजहंस गड येथे दुपारी 12 वाजता अंतिम संस्कार केले जाणार आहेत.