बेळगाव लाईव्ह :मंदिराची स्वच्छता करताना शॉक लागून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे घडली आहे.
सविता फकीराप्पा वंटी वय 34 आणि कलावती मारुती बिदरवाडी वय 41 दोघेही राहणार सुळेभावी अशी या दुर्घटनेत मयत झालेल्या महिलांची नावे आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुळेभावी गावच्या वाल्मिकी देवस्थानात महिला संघाची सभा संपल्यानंतर मंदिरची स्वच्छता करताना सदर महिलांना शॉक लागला होता.
मंदिरात विद्युत भारीत तुटून पडली होती खाली पडलेली तार लोखंडी गेटला स्पर्श झाली होती लोखंडी गेट लावताना दोन्ही महिलांना शॉक लागला त्यातच दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मारिहाळ पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाणी केली आहे