Monday, September 9, 2024

/

शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी उचलला ५० विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेता यावे, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, दर्जेदार शिक्षणाने आजची पिढी पुढे जावी या उद्देशाने टिळकवाडी येथील एस. के. इ. सोसायटी संचालित ठळकवाडी हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या शाळेतील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलून शाळेने आपल्यावर केलेले ऋण फेडले आहेत.

ठळकवाडी हायस्कुलच्या १९९२ सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला असून टीएचएस ९२ या नावाखाली फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून दरवर्षी 50 गरजू विद्यार्थ्यांची फी भरली जाणार आहे त्यामुळे एक प्रकारे शाळा टिकण्यासाठी दर्जा वाढविण्यासाठी याची शाळेला मदत होणार आहे.

आपल्याला शाळेने आजवर खूप दिले, या शाळेसाठी आपणही काही देणं लागतो या उद्देशाने या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ५० गरजू आणि होतकरू मुलांच्या शैक्षणिक खर्चाची तजवीज या माजी विद्यार्थ्यांनी केली असून या फाउंडेशनमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, फॅब्रिकेटर्स यासह अनेक विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सहभाग आहे.Ths 92

हा उपक्रम यंदा सुरु करण्यात आला असून दरवर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे. यंदा या शाळेतील ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी मदत करण्यात आली असून सदर रकमेचा धनादेश सहली व्यवस्थापनाकडे टीएचएस ९२ फाउंडेशनच्या वतीने सुपूर्द करण्यात आला आहे.

बेळगाव शहरातील नामांकित मराठी शाळा असणारी ठळकवाडी हायस्कुल हि शाळा मातृ भाषेत शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवत असते. या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत.

या शाळेतील शिक्षण व्यवस्था, शिक्षणाची पद्धत यामुळे समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला सहकार्य मिळावे, या उद्देशाने अनेक माजी विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. ज्यांना शिक्षणाचा खर्च पेलवणारा नाही परंतु शिक्षणाची अत्यंत ओढ आहे, आवड आहे, असे विद्यार्थी शिक्षणापासून केवळ आर्थिक समस्यांमुळे मागे राहू नयेत, शिक्षणापासून वंचित राहू नयेत हा उद्देश ठेवून टीएचएस फाउंडेशन ९२ च्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.