बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये गांजा, पिन्नीसह विविध अमली पदार्थांची विक्री व सेवन सर्रास सुरू असल्याचे प्रकार निदर्शनात येत असून बेळगाव पोलिसांनी हेरॉईन-ड्रग्ज विक्रीचे जाळे उघडकीस आणले आहे.
बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग यांनी बेळगावमध्ये विशेष मोहीम राबवून शहरातील गांजा व इतर अमली पदार्थांच्या विक्रीचा गांभीर्याने विचार केला असून अनेक दिवसांपासून ड्रग्ज माफियांशी लढा देणाऱ्या बेळगाव पोलिसांनी आज हेरॉईन-ड्रग्जचे जाळे शोधून काढले असून टिळकवडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी 50 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करत त्याची विक्री करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणी प्रफुल्ल गजानन पाटील, सुशांत गोविंद कंग्राळकर, नारायण बाबुराव पाटील, सुनिल बैरू असलकर, सलमान बब्बर मोकाशी यांना अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेले पाचही आरोपी अनगोळ परिसरातील रहिवासी आहेत.
टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करून अमली पदार्थ विक्रीचे जाळे उघड करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.