बेळगाव लाईव्ह :कोलकाता येथे नुकत्याच घडलेल्या निंद्य घटनेचा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव आणि भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून त्या घटनेचा निषेधार्थ एकत्र येऊन देशभरातील डॉक्टर्स आज 17 ऑगस्ट रोजी करत असलेल्या शांततापूर्ण निदर्शनाला त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे डॉ. सरनोबत यांनी मेणबत्ती मोर्चात सहभागी झालेल्या तसेच कठुआ आणि हाथरस सारख्या देशाच्या इतर भागांमध्ये अशाच प्रकारच्या घटनांचा निषेध करणाऱ्यांनी या घटनेच्या विरोधात आवाज उठवावा असे आवाहन केले.
“एकत्र उभे राहून संघटितपणे न्यायाची मागणी करण्याची वेळ आली आहे” असे सांगून वैद्यकीय समुदायासोबत एकता आणि दृढैक्य निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आजच्या शांततापूर्ण निदर्शनात देशभरातील डॉक्टर या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हेगारावर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी एकत्र येतील.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी केलेला निषेध आणि निदर्शनाला दिलेल्या पाठिंब्याचा प्रतिध्वनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र आलेल्या देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या माध्यमातून उमटणार आहे.