बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अवमान प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये आंदोलन छेडलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मार्केट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतील ४० जणांची नावे गेल्या दोन दिवसांपूर्वी वगळण्यात आली असून गुन्ह्यातील आणखी ४ जणांवरील आरोपपत्र मागे घेण्यात आले आहे.
माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, मयूर बसरीकट्टी, राधेश शहापूरकर यांचा यामध्ये समावेश असून यांच्यावर भादंवि कलम ३०७ अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज न्यायालयाने या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानुसार सर्वांना न्यायालयासमोर हजर करून बाजू मांडण्यात आली. उच्च न्यायालयाने या चौघांचीही नावे सदर आरोपातून वगळली असून एकूण ५३ जणांपैकी आधी ४० आणि आज ४ अशा ४४ जणांची नावे वगळण्यात आली आहेत.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत बळवंत रामा शिंदोळकर, नरेश राजू निलजकर, मेघराज रवळनाथ गुरव, विनायक ईश्वर सुतार, सुनील प्रकाश लोहार, नागेश हणमंत काशिलकर, रोहित महादेव माळवी, शुभम विजय सुतार. शुभम राहुल बांदेडकर,. सागर बंडू केरवाडकर, विनायक संजय सुतार, श्रेयस उर्फ सोनू उर्फ श्री सुहास खटावकर, गजानन ज्योतिबा जाधव, विनायक उर्फ मायाप्पा परशुराम कोकितकर, दयानंद दत्ता बडसकर, सूरज सुभाष गायकवाड, राहुल मदन बराले, गौरव उर्फ गौरांग जगन्नाथ गेंजी, रत्नप्रसाद लक्ष्मण पवार, सरिता विराज पाटील, लोकेश उर्फ लोकनाथ जयशिंग राजपूत, सुदेश परशुराम लाटे , राहुल रमेश सावंत, सिद्दू उर्फ श्रीधर, दिलीप गेंजी, विक्की प्रकाश मंडोळकर, सूरज रामा शिंदोळकर, भालचंद्र दत्त बडस्कर, विनायक रवींद्र हुलजी, हरीश प्रेमकुमार मुतगेकर, भरत लक्ष्मण मेस्सी, बागेश बाळाराम नंद्याळकर, हृतिक तानाजी पाटील, राजेंद्र गौतम बैलूर, विश्वनाथ रवी घोटाडकी अशा ४० जणांवरील आरोप पत्र मागे घेण्यात आले होते.
या खटल्यात ऍड. नागरत्ना शामसुंदर पत्तार, ऍड. शामसुंदर पत्तार आणि ऍड. हेमराज बेंचन्नावर यांनी काम पाहिले.