Monday, December 30, 2024

/

मुख्यमंत्र्यांनी बेळगावच्या शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यावी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग कुडची चिकोडी आणि गोकाक येथे आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगाव जिल्ह्याचा दौरा करत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याच्या नवीन मुख्य सचिव शालिनी रजनीश यादेखील बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत शालिनी रजनीश यांनी यापूर्वी बेळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पद सांभाळलं होतं त्यामुळे त्यांना बेळगाव विषयी चांगलीच माहिती आहे. मुख्यमंत्री बेळगाव दौऱ्या दरम्यान सोमवारी सायंकाळी ते बेळगाव शासकीय विश्राम धामात देखील येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या पूरग्रस्त दौऱ्यासोबत बेळगावच्या शेतकऱ्यांच्या पुराने झालेल्या समस्यांच्या व्यथा देखील समजून घ्याव्या असे खुले पत्र शेतकरी नेते राजू मर्वे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिले आहे.

एकीकडे मुख्यमंत्र्याचा पूरग्रस्त भागाचा दौरा असताना सोमवारी सकाळीच बेळगावचे शेतकरी विशेषता बळळारी नाला पुराने ग्रस्त झालेले शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली व्यथा सांगणार आहेत.
बळ्ळारी नाला विकास संदर्भात तसेच इतर समस्या बाबत उद्या सोमवारी 5 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी यांना शेतकरी संघटना,शेतकरी बंधूतर्फे निवेदन देण्याचे ठरले आहे.तेंव्हा वडगाव,शहापूर, अनगोळ,जूनेबेळगाव, माधवपूर,येळ्ळूर, धामणे,हालगा,बेळगाव व इतर शिवारातील सर्व शेतकरी बंधूनी मोठ्या संखेने हजर रहावे ही विनंती देखील करण्यात आली आहे.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना शेतकरी नेते राजू मर्वे यांनी लिहिलेले खुले पत्र..

Marve raju
Farmer leader raju marve

सन्माननिय मुख्यमंत्री साहेब……तर येथील शेतकरी आपल्याला धन्यवाद देतील.

देशातील कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना भाषा,जात,पंथ,पक्षात न अडकवता त्यांच्या सर्वांगिन विकासासाठी प्रत्येक सरकारने करत राहणे. हे त्यांच आद्य कर्तव्य असत.कारण देशाच्या जडणघडणीत शेतकरी हाच मुख्य घटक आहे याची जानिव ज्या सरकारला असेल तेच सरकार तरेल.जर शेतकऱ्यांना पाण्यात पहाणारे सरकार असेल तर ते पाण्यावरचा बुडबुडाच.याची झलक मागील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दिसून आलीच आहे.
असो.आताच्या सरकारमधील सन्माननिय मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याबद्दल किती सहानुभूती आहे याची झलक दाखवून दिली.त्याचा बोलबाला साऱ्या देशभर झाल्याच्या बातम्या प्रत्येक वृत्तपत्र,सोशलमिडिया,टिवी माध्यमातून प्रसारित झाल्या.ती म्हणजे बंगलोरमधील एका मॉलमधे साध्या धोतर,अंगरखा पेहराव्यात आपल्या मुलाबरोबर गेला असता तेथील गार्डने त्यांचा अवमान करत आत प्रवेश नाकारला.हि बातमी बघताबघता सोशल मिडियामधून पसरली.हे मा.मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेऊन सदर मॉलवर कडक कारवाई करत ते काही काळासाठी बंद करत गार्ड व मालकावर कडक कारवाई करत त्या साध्या वेषातील शेतकऱ्याची जाहिर माफी तसेच मालकाला शेतकऱ्याचा यथोचित सन्मान करुन यापूढे शेतकऱ्यावर कोनी अन्याय केलातर कोणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड दम दिल्याने मॉल,हॉटेल व इतर व्यवसाईकांचे धाबेच दणाणले गेले.पहाता पहाता हि बातमी साऱ्या देशभर पसरली आणी कर्नाटक मुख्यमंत्री साहेबांचे देशातील शेतकरी कौतूक करु लागल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.बाजूच्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांनी वहाव्वा केली.
अशाच कौतूकाची कायमची थाप हवी असेलतर सन्माननिय मुख्यमंत्री साहेब सोमवारी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.त्यांनी बेळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पीकं,घर,जनावर व इतर नुकसान झालेल्याची पहाणी तर करावीच.त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांना शाप ठरलेल्या बळ्ळारी नाला व परिसरातील पीकांची कशी हानी झाली आहे याची येळ्ळूर रस्ता पुलावर आल्यास अनगोळ,शहापूर,वडगाव शिवारातील पुराने कुजत चाललेल्या पीकांची तसेच पीकाऊ जमीन भू महसूल कायदा 1964 कलम 95 याचा कांही धनदांडगे शेतकरी व व्यवसाईक गरजू शेतकऱ्याकडून शेती खरेदी करुन आजूबाजूच्या शेतकऱ्यांची परवानगी न घेता मातीचा भराव टाकून बाजूच्या शेतकऱ्यांचे किती नुकसान होत आहे त्याचबरोबर थोड्याच अंतराव असलेला शेतकऱ्यांचा विरोध व मा.उच्च न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत येथील प्रशासन,महामार्ग प्राधिकरण खाते,ठेकेदाराच्या मनमानीने कायदा मातीत गाडून चाललेले हालगा-मच्छे बायपासचीही पहाणी करत त्यामुळेही होणारे इतर शेतकऱ्यांचे अतोनात नुकासानाचीही पहाणी करत तिथेही पाणी थांबून पीकांच्या नुकसानाची तत्परतेने प्रत्यक्ष पहाणी करुन या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी अतिवृष्टीने नुकसान करत येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान कसे होते आणि त्यावर कायमचा तोडगा काढत येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सन्माननिय मुख्यमंत्री मा.सिध्दरामय्या साहेब आपण येथील शेतकऱ्याप्रती आत्मियता दाखवत बळ्ळारी नाला प्रश्न कायमचा मार्गी लावत त्याचबरोबर बेकायदेशीरपणे होत असलेला तिबारपीकी जमीनीतील हालगा-मच्छे बायपास रद्द केल्यास येथील अल्पभूधारक शेतकरी आपल्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाहीत.

कळावे.. आपला
राजू मर्वे ( शेतकरी नेते बेळगाव)

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.