बेळगाव लाईव्ह: दरवर्षीप्रमाणे यंदाही समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्धार श्री राम युवक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीत, राजहंस गल्ली-अनगोळ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीची निवड देखील करण्यात आली.
गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना मदत, व्यसनमुक्तीसाठी उपक्रम, व्यायाम शाळेची उभारणी, विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन यासह अनेक समाजाभिमुख उपक्रम आजवर राबविले आहेत.
मंडळाच्या विधायक कार्यासाठी तसेच गणेशमूर्तीसाठी विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत. या मंडळाची स्थापना १९६९ साली झाली असून यावर्षी या मंडळाला 56 वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाही समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत.
निवड झालेले पदाधिकारी खालील प्रमाणे
राजहंस गल्ली-अनगोळ येथील श्री राम युवक मंडळ,गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. २०२४-२५ या वर्षासाठी मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश बाळू कुर्याळकर, उपाध्यक्ष : मारुती सुरेश हुंदरे, आनंद जगन्नाथ चौगुले,
सचिव : नागराज दत्ता सुळगेकर, हेमंत तानाजी जाधव, उपसचिव : सुदर्शन अनिल जाधव, श्रीनाथ मनोहर लाटूकर, खजिनदार : स्वप्निल अशोक पाटील, सौरभ अशोक परमोजी, उपखजिनदार : निखिल नंदू सुरुतेकर, अक्षय शेखर मुधोळकर , कार्याध्यक्ष : प्रीतम प्रकाश पाटील, मयूर अशोक पाटील, उपकार्याध्यक्ष : हरी नागेश लाटुकर, सुशील शेखर मुधोळकर, हिशोब तपासणी : मदन जाधव, बाळू मुचंडीकर, श्रीकांत कुर्याळकर, संदीप लाटुकर, शिवाजी जाधव, रोहन सुळगेकर, राहुल परमोजी अशी पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.