बेळगाव लाईव्ह :चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावामधील सुप्रसिद्ध श्री वीरभद्रेश्वर देवस्थान आज रविवारी सकाळी पुराच्या पाण्यामुळे जलमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे यावर्षी कृष्णा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात पात्रा बाहेर पडून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
परिणामी येडूर येथील श्री वीरभद्रेश्वर देवस्थानामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून संपूर्ण देवस्थान जलमय झाले आहे.
सध्या या देवस्थानामध्ये सुमारे 3 ते 4 फूट इतके पुराचे पाणी साचलेले पहावयास मिळत आहे.