belgaum

टिळकवाडी मधील सायन्स पार्कचे नूतनीकरण करा: रमाकांत कोंडूस्कर

0
25
Science park
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेने मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील दीडशे वर्षाचा इतिहास असणाऱ्या महात्मा फुले उद्यानातील दुर्लक्षित सायन्स पार्कचे नूतनीकरण करून या पार्कची चांगली देखभाल करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केली आहे.

मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील महात्मा फुले उद्यानातील दुर्दशा झालेल्या सायन्स पार्कची पाहणी केल्यानंतर ते बेळगाव लाईव्हशी बोलत होते. टिळकवाडी येथील महात्मा फुले उद्यानामध्ये दशक भरापूर्वी सायन्स पार्कची उभारणी करण्यात आली होती. हा प्रकल्प उभारण्याचा उद्देश पालकांसमवेत उद्यानामध्ये खेळण्या बागडण्यासाठी येणाऱ्या मुलांची लहान वयात विज्ञानाशी ओळख व्हावी, हा होता.

मात्र अलीकडे काही वर्षापासून या सायन्स पार्कची देखभाली अभावी पार दुर्दशा झाली आहे. या दुर्दशेची आज बुधवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी पाहणी केली.

 belgaum

उद्यानाच्या पाहणी दौऱ्यानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना कोंडुसकर म्हणाले की, मंगळवार पेठ टिळकवाडी येथील महात्मा ज्योतिबा फुले उद्यान हा ब्रिटिश कालीन बगीचा आहे.

या ठिकाणी कांही वर्षांपूर्वी सायन्स पार्क नावाचा प्रकल्प उभारण्यात आला होता. लहान वयात मुलांना बागेत खेळताना, बागडताना विज्ञानाची ओळख करून देणारा हा प्रकल्प अतिशय चांगला होता. पीव्हीजी उद्योग समूहाने हा प्रकल्प दीर्घ मुदतीच्या भाडे करारावर चालविण्यास घेतला होता. हा भाडेकरार समाप्त झाल्यानंतर सदर सायन्स पार्क वाऱ्यावर पडली असून देखभाल अभावी या पार्कची दुर्दशा झाली आहे.Science park

तेंव्हा बेळगाव महापालिका प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी दीडशे वर्षाचा इतिहास असणाऱ्या महात्मा फुले उद्यानातील या सायन्स पार्कची चांगली देखभाल करावी. या ठिकाणची कोसळण्याच्या स्थितीत असलेली भिंत व इतर गोष्टींची दुरुस्ती करून या सायन्स पार्कचे नूतनीकरण केले जावे.

जवळच स्मार्ट सिटी अंतर्गत एका उद्यानाची निर्मिती केली जाते आणि दीडशे वर्षाचा इतिहास असणाऱ्या या उद्यानातील लहान मुलांसाठी उपयुक्त विज्ञानाची माहिती देणाऱ्या सायन्स पार्ककडे दुर्लक्ष केले जाते याबद्दल खेद व्यक्त करून महापालिकेने गांभीर्याने दखल घेऊन या सायन्स पार्कचे नूतनीकरण करून या पार्कची योग्य प्रकारे देखभाल करावी, अशी विनंती रमाकांत कोंडुसकर यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.