बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेच्या चारही स्थायी समितीची निवडणूक आज मंगळवारी बिनविरोध पार पडली असून निवड झालेल्या सदस्यांची नावांची घोषणा करण्यात आली आहे.
सदर अविरोध निवडीद्वारे स्थायी समित्यांमध्ये प्रत्येकी सत्ताधारी गटाच्या 5 आणि विरोधी गटाच्या 2 सदस्य नगरसेवकांना स्थान देण्यात आले आहे. बेळगाव महापालिकेच्या नव्या स्थायी समित्या पुढील प्रमाणे आहेत. आरोग्य स्थायी समिती : श्रीशैल कांबळे, रूपा चिक्कलदिनी, दिपाली टोपगी, राजू भातकांडे, माधवी राघोचे, अस्मिता पाटील, लक्ष्मी लोकरी.
सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती : अभिजीत जवळकर, संतोष पेडणेकर, रविराज सांबरेकर, जयतीर्थ सौंदत्ती, उदय उपरी, बसवराज मोदगेकर, शिवाजी मंडोळकर.
अर्थ स्थायी समिती : मंगेश पवार, सारिका पाटील, शंकर पाटील, प्रिया सातगौडा, रेशमा कामकर, रेश्मा भैरकदार, शकीला मुल्ला.
अर्थ आणि कर स्थायी समिती : नेत्रावती भागवत, पूजा पाटील, नितीन जाधव, ब्रम्हानंद मिरजकर, हनुमंत कोंगली, इक्रा मुल्ला, जरीना फत्तेखान.
सत्ताधारी गटाच्या वतीने दक्षिण आमदार आणि माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांची निवड केली. गेली विरोधी गटातर्फे आमदार असिफ शेठ यांनी आपल्या सदस्यांची नावे निश्चित केली. प्रारंभी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य नगरसेवक रवी साळुंखे सत्ताधारी गटातील उमेदवाराच्या विरोधात उभे ठाकले होते.
परंतु सत्ताधारी गटाने साळुंखे यांना स्थायी समितीत घेतला तर निवडणूक करावी लागेल असा इशारा दिल्यामुळे त्यांनी आपले नाव मागे घेतले.
. या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.