बेळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी होणार राज्याच्या चीफ सेक्रेटरी

0
3
Shalini rajnish
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव हा कर्नाटक राज्यातील व्याप्तीने सर्वात मोठा जिल्हा आहे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बनल्यावर मोठा अनुभव त्या अधिकार्‍याला येत असतो. 19 वर्षापूर्वी बेळगावचे जिल्हाधिकारी बसवलेल्या महिला जिल्हाधिकारी शालिनी रजनीश या आता राज्याच्या मुख्य सचिवपदी विराजमान होणार आहेत.

कर्नाटक राज्य सरकारचे मुख्य सचिव रजनीश गोयल येथे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे आज शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या पत्नी शालिनी रजनीश यांची राज्य सरकारच्या भावी मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राज्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शालिनी रजनीश यांची राज्य सरकारच्या पुढील मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Shalini rajnish

 belgaum

विद्यमान मुख्य सचिव रजनीश गोयल येत्या पाच दिवसात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे शालिनी रजनीश्यांची नव्या मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, असे मंत्री एच. के. पाटील यांनी यांनी सांगितले. या पद्धतीने एकंदर पतीच्या निवृत्तीनंतर त्याचे महत्त्वाचे पद पत्नीकडे जाणार आहे.

शालिनी रजनीश यांनी बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पद भूषवले होते. जून 2005 ते एप्रिल 2007 या काळात एक वर्ष 11 महिने त्या बेळगावच्या जिल्हाधिकारी होत्या. बेळगावचे जिल्हाधिकारी पद बसवलेल्या व्यक्तीला राज्याचे मुख्य सचिव पद मिळाल्याने बेळगावला देखील त्याचा लाभ व्हावा अशी चर्चा बेळगावकरात रंगताना दिसत आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी पदभूषाल नंतर त्यांनी राज्याच्या अनेक विभागाच्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.