Monday, July 15, 2024

/

दागिने चोरट्याला शहापूर पोलिसांकडून अटक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवणाऱ्या चोरट्याला पकडण्यात शहापूर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी चोरट्या कडून तब्बल साडेसात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त केले आहेत.

प्रज्वल जयपाल खानजी वय 28 राहणार बस्तवाड रोड धामणे असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्या कडून 103 ग्रॅम चे सोन्याचे दागिने आणि चोरी करण्यास वापरण्यात येणारी दुचाकी असे मिळून 7 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जत करण्यात आला आहे.

संशयित आरोपीने चोरी केलेले दागिने फायनान्सच्या लॉकरमध्ये ठेवले होते.संशयित आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

बेळगाव शहरातील शहापूर आणि टिळकवाडी उद्यमबाग पोलीस स्थानक व्याप्तीतील अनेक महिलांच्या गळ्यातील हार लंपास केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.शहापूर पोलीस निरीक्षक एस एस सीमानी, पोलीस उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी आधी सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.Shahapur police

प्रज्वल हा शहापूर परिसरात चोरीच्या प्रयत्नात असताना संशयास्पद रित्या वाढताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

पोलीस आयुक्त याडा मार्टिन, उपायुक्त पी व्ही स्नेहा, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.