Friday, October 18, 2024

/

राकसकोप जलाशय ओव्हरफ्लो! जलाशयाचे दोन दरवाजे उघडले

 belgaum

बेळगाव लाईव्ह : धरण आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप जलाशय भरून वाहात आहे. गुरुवारी सायंकाळी जलाशयाचे २ दरवाजे २ इंचांनी उघडले असून जलाशय तुडुंब भरण्यासाठी अद्याप २ फूट पाण्याची गरज आहे.

जलाशयात एकूण २४७५ फुटांपैकी २४७३ फूट पाणीसाठा उपलब्ध आहे. हा जलाशय तुडुंब झाल्याने बेळगावकरांची यंदाची पाणी समस्या काही अंशी मिटली म्हणावी लागेल.

सर एम विश्वेश्वरय्या यांनी पुण्यामधील एका कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असताना १९६४ साली या जलाशयाची आखणी केली होती, गेल्या दहा वर्षात ४ ऑगस्ट २०१०, १८ जुलै २०११, ६ ऑगस्ट २०१२, २२ जुलै २०१३, ३० जुलै २०१४, ४ ऑगस्ट २०१५, ७ ऑगस्ट २०१६, १० सप्टेंबर २०१७, १६ जुलै २०१८, ३० जुलै २०१९, ६ ऑगस्ट २०२०, २२ जुलै २०२१, १७ जुलै २०२२, ऑगस्ट २०२३ आणि यंदा १८ जुलै २०२४ यावेळी हे जलाशय ओव्हरफ्लो झाले आहे.Rakaskppp

बेळगावच्या इतिहासात यंदा प्रथमच राकसकोप जलाशय वेगाने भरून दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

राकसकोप जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने बेळगाव शहरालगत वाहणाऱ्या मार्कंडेय नदीत पाण्याची आवक वाढली आहे. दरवर्षी जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये भरणारे जलाशय जुलैच्या मध्यावधीच भरल्याने हि बाब बेळगावकरांसाठी आनंदाची आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.