बेळगाव लाईव्ह:राज्यसभेचे खासदार इराण्णा कडाडी यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कर्नाटकात सुरू असलेल्या विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबद्दल माहिती देऊन बेळगावशी संबंधित खालील तीन गोष्टींचा उल्लेख केला आहे.
सहा पदरी बेळगाव ते संकेश्वर बायपास (पॅकेज -1) (एनएच-4) एकूण प्रकल्प खर्च (टीपीसी) रुपयात 1479.3, लांबी 40.017 कि.मी. पैकी पूर्ण 53.61 टक्के
सहा पदरी संकेश्वर बायपास ते महाराष्ट्र/कर्नाटक सीमा (पॅकेज -2) (एनएच-4) एकूण प्रकल्प खर्च रुपयात 1388.7, लांबी 37.83 कि.मी. पूर्ण -42.45 टक्के.
कि.मी. 30.800 ते कि.मी. 70.800 पासून 2एल पीएसचे शिल्लक काम आणि एनएच-4ए च्या खानापूर ते कर्नाटक/गोवा सीमा विभागाच्या कि.मी. 70.800 ते कि.मी. 84.120 पर्यंत कठोर कॅरेजवेसह 2 एल काम -53.32 कि.मी. पैकी 49.59 टक्के पूर्ण झाले आहे.