बेळगाव लाईव्ह : आपली पत्नी दुसऱ्याबरोबर मोटरसायकल वरून जात असल्याचे दिसताच पतीने त्या दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून एकाचा निर्घृण खून केल्याची घटना जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील लक्ष्मेश्वर येथे सोमवारी सकाळी घडली आहे.
मौलासाब यासीन मोमीन (वय 28) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मौला साहेब आणि अमोघ ढवळेश्वर याची पत्नी शिल्पा हे दोघेजण आज सकाळी मोटरसायकल वरून जात होते.
आपली पत्नी दुसऱ्यासोबत मोटरसायकल वरून जात असल्याचे अमोघ याला दिसताच त्याने त्यांना रस्त्यात अडवले. तसेच दोघांवर देखील प्राणघातक शस्त्राने हल्ला चढविला.
या हल्ल्यात मौलासाब मोमीन जागीच ठार झाला. पोलिसांनी अमोघ याला ताब्यात घेतले असून याप्रकरणी कुलगोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.