Thursday, January 9, 2025

/

मोहम्मद रोशन बेळगावचे नवे डीसी

 belgaum

बेळगाव लाईव्ह: राज्य सरकारने नुकताच राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा समावेश आहे.

नितेश पाटील यांची बदली बेंगळूर येथे लघु मध्यम उद्योग विभागाचे संचालक म्हणून करण्यात आली आहे तर हेस्कॉम चे एमडी मोहम्मद रोशन यांची बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मोहम्मद रोशन 2015 सालच्या बॅचचे युवा आय एस अधिकारी आहेत. तात्कालीन जिल्हाधिकारी एम.जी हिरेमठ यांच्या सेवानिवृत्तीनंतर 5 मे 2022 रोजी नितेश पाटील यांनी बेळगाव जिल्हाधिकारी पदाचा भार स्वीकारला होता त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी नितेश पाटील यांची बदली बेंगलोर येथे झाली आहे.

दोन वर्षाच्या काळात नितेश पाटील बेळगावात पार दर्शक पद्धतीने लोकसभा विधानसभा निवडणूक पार पाडली त्याचे लक्ष सर्वांनीच वेधून घेतले होते. विशेष म्हणजे मागील बेळगाव लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया जगभरात पोहोचली होती जिल्ह्याला गेल्या 2 वर्षात त्यांनी अनेक संकटातून बाहेर काढले होते

Mohamnad roshan

तर नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे युवा आयएएस अधिकारी आहेत लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत. ते मुळचे हैदराबादचे असून या आधी त्यांनी हेस्कॉम हुबळी सह अनेक ठिकाणी सेवा बजावली असून कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत. त्यांच्या पत्नी देखील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी असून मैसूर रेल्वेत दक्षिण पश्चिम रेल्वेत सिनियर डी ओ एम या पदावर कार्यरत आहेत.

In a major administrative restructuring, the Karnataka Government executed the transfer of 20 IAS Officers on Thursday.

The newly released transfer list reveals that Mohammad Roshan, an IAS officer (KN: 2015), currently serving as Managing Director,  Huballi Electricity Supply Company Limited,  Huballi  Hescom has been appointed as the new Deputy Commissioner of  Belgaum District with immediate effect and posted until further orders, He will be replacing  Nitesh  Patil IAS, who was recently transferred as Director, Micro, Small and Medium enterprises, Bengaluru.

#MohammdRoshanias #BelgaumDc #niteshpatil

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.