बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मोदगा या गावातील श्री मारुती मंदिर ट्रस्टची ९२ एकर ३९ गुंठे जमीन ही एका रियल इस्टेट व्यावसायिकाने हडप केली असून सदर जमीन ट्रस्टला परत करण्यात यावी या मागणीसाठी श्रीराम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपूर्वी आंदोलन छेडण्यात आले असून आज या प्रकरणी प्रमोद मुतालिक यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली.
मारुती मंदिर देवस्थान ट्रस्टची एकूण १०० एकर जागा असून गेल्या ५० वर्षांपासून या जगायला आंदोलन सुरु आहे. या जागेसंदर्भात ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
खानापूर येथील नासिर बागवान यांनी सदर जागा एका माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने हडप करण्याचा प्रयत्न केला असून सदर जागा ही देवस्थानाच्या हक्काची जागा आहे.
या जागेपैकी १ इंचही जागा इतरांना दिली जाणार नाही, ही जागा केवळ देवस्थानाचीच आहे, या जागेच्या संरक्षणासाठी १० हजार हिंदूंना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.