बेळगाव लाईव्ह :मराठा सेवा संघ बेळगांव जिल्हा यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 7 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत इयत्ता 9 वी पुढील विद्यार्थी व पालकांसाठी ‘मनोबल’ (माईंड पॉवर) या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
गणेश कॉलनी, संभाजी नगर, वडगांव बेळगांव येथील मराठा सभागृहात होणाऱ्या या परिसंवादात कोल्हापूरचे प्रसिध्द माईंड ट्रेनर आणि मोटिवेशनल स्पिकर शिवश्री विनोद कुराडे हे विद्यार्थी, पालक आणि समाज बांधवांना संबोधित करणार आहेत.
मुले ऐकत नाहीत, चिरखोड स्वभाव, उलट बोलणे, सारखे टि.व्ही पाहणे, हुशार आहे पण आभ्यास करत नाहीत, या सर्व समस्यांचे निवारण करुन मुलांचा सर्वांगिण विकास कसा केला जाईल याबाबत ते मार्गदर्शन करतील.
तसेच स्मरणशक्ती, एकाग्रता व आत्मविश्वास कसा वाढवावा, परिक्षेत भरघोस यश मिळविण्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी, क्रिएटिव्ह व्हिजुयलायझेशनव्दारे हवं ते यश कस मिळवायच याची माहितीही शिवश्री विनोद कुराडे देणार आहेत
. तरी पालकांनी आपल्या पाल्यांसह तसेच समाज बांधवांनी रविवारी सकाळी ठीक सकाळी 10 वाजता उपस्थित राहून या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा सेवा संघ बेळगांवतर्फे करण्यात आले आहे.