Sunday, July 7, 2024

/

मराठा मंडळाचा शैक्षणिक उपक्रम दिन*

 belgaum

बेळगाव लाईव्ह ;बेळगाव येथील मराठा मंडळ ही शिक्षण संस्था आजवर नानाविध लोकाभिमुख उपक्रम राबवत आली आहे. संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष कै श्री नाथाजीराव गुरूअण्णा हलगेकर यांनी काटकसर करून संस्थेचा शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला. शिक्षण संस्था सर्वांगाणं वाढली पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. बघता बघता या संस्थेचे रूपांतर शिक्षणाची अनेक दालणे निर्माण करणाऱ्या व आधुनिकतेची कास धरणाऱ्या शिक्षण संस्थेत झाले.

आज ही संस्था मराठा मंडळाच्या कल्पक अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांच्या नियोजनबद्ध शैक्षणिक वाटचालीत झपाट्याने गतीमान होताना दिसते आहे.
22 जूलै हा कै श्री नाथाजीराव गुरूअण्णा हलगेकर यांचा पुण्यस्मरण दिन, शिक्षणाच्या कक्षा रूदांवाव्यात म्हणून प्रतिकूल परिस्थितीत झगडणाऱ्या बहुआयामी नेतृत्वाचा हा पुण्यस्मरण दिवस *शैक्षणिक उपक्रम दिन* म्हणून गेली आठरा वर्षे साजरा करण्यात येत आहे .

याचं दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक शिबिरे, नामांकित शिक्षणतज्ज्ञांची व्याख्याने, विद्यार्थी व शिक्षक भाषण स्पर्धा, शैक्षणिक तंत्रज्ञानाशी निगडीत गोष्टी यावर चर्चा सत्रांचे आयोजन अशा विविधांगी गोष्टींचा आंतरभाव आजवर पुण्यस्मरण दिनी करण्यात आला आहे.
यावर्षीही विद्यार्थ्यांच्या संभाषण कलेला वाव देण्यासाठी भव्य अशा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन रविवार दिनांक 14 जूलै 2024 रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता केले असून ही स्पर्धा तयारीच्या विषयाला जोडून आयत्या वेळी बोलण्याच्या विषयावर पूर्णतः अवलंबून असून या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत. तरी संबधित शिक्षक व मुख्याध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेण्यास उपकृत करावे असे आवाहन मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांनी केले आहे.

 belgaum

स्पर्धेचे विषय असे आहेत.
1.*पाल्याच्या ( माझ्या) जडणघडणीत पालकांची भुमिका*

2.*शिक्षण आणि शासनाची जबाबदारी.*

3.*कृत्रीम मेधा ( AI) आणि तंत्रज्ञानाने बदललेले शिक्षण*

4.*शिक्षणव्यवस्थेतील कालसुसंगत बदलाची गरज*

अणि आयत्यावेळी बोलण्याचे विषय असे आहेत…

1) शाळा माझी लाडकी!
2) शाळा सुटली घंटा वाजली
3) संस्कार
4) मी फळा बोलतोय!
5) आरश्यात बघताय?
6) वाचताय ना आम्हाला?
7) आला आला पहिला पाऊस
8) तुमचा लाडका /मी मोबाईल
9) माझे आज्जी आजोबा
10)हे जुने नाही पुरातन आहे!
11) कोण माझे जवळचे आई की बाबा?
12) मी पाहिलेला किल्ला.
13) मतदान हक्क आणि जबाबदारी!
14) आजची सशक्त महिला!

15) येईलच बस – इथे थांबा
16) माझे दैवत!
17) झंडा उंचा रहे हमारा!
18) मला पंख असते तर?
19) माझे छंद!
20) ही आमुची प्रार्थना
21) आली की परीक्षा……….
22) इंद्रधनुष्य!
23) मला रोज वाचा….. ( वर्तमानपत्र)
24) स्वप्न साकारणार!
25) एक अविस्मरणीय क्रिकेट
सामना!
26) प्रसार माध्यमे – संकट का सोय?
27) माझ्या स्वप्नातला भारत
28) जागतिक तापमानवाढ
29) एक अविस्मरणीय आठण लॉकडाउनची!
( कोविड)
30) स्वच्छता अभियान
सदर स्पर्धा शाळेतील प्रत्येकी फक्त दोन विद्यार्थ्यांसाठी मर्यादीत असेल याची नोंद घ्यावी……

स्थळ वेळ
मराठा मंडळ सकाळी 9.30
चव्हाट गल्ली
बेळगाव.

डॉ. राजश्री नागराजू
अध्यक्षा
मराठा मंडळ बेळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.