Sunday, November 24, 2024

/

सुदैवाने… नदीकाठची झुडपाची काठी पकडल्याने तो वाचला

 belgaum

बेळगाव लाईव्ह : नाल्यावरील पुलावरून जाणाऱ्या वाहत्या पाण्यात दुचाकी चालवणं अंगलट आलं असतं मात्र केवळ सुदैवानं म्हणून एका इसमाचा जीव वाचला आहे. खानापूर तालुक्यातील मणतूर्गा जवळील वाहणाऱ्या हालात्री नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली आहे.

विनायक जाधव राहणार शहापूर बेळगाव असे या घटनेत वाचलेल्या दुचाकीस्वार युवकाचे नाव आहे. सध्या खानापूर हालात्री नदीला पूर आला आहे मणतूर्गा जवळील पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहून जात आहे त्यामुळे या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गोव्याहून, हेमाडगा मार्गे खानापूरकडे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून विनायक याने मंणतूर्गा जवळील हालात्री नदीवरील, पाणी असलेल्या पुलावर दुचाकी घातली तो पाण्यातून वाहून नाल्यात कोसळला आणि दुचाकी सह वाहून गेला.दुचाकीसह वाहून जात असताना, नदीकाठावरील एका झुडपाची काठी पकडली, त्यामुळे त्या ठिकाणी तो अडकून राहिला.

सदर घटना वाऱ्यासारखी पसरली असता, खानापूर येथील अग्निशामक दलाची गाडी, व नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली.Khanapur incident

यावेळी अग्निशामक जवळ असलेली दोरी घेऊन, सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर व भाजपा युवा नेते पंडित ओगले यांनी, सदर व्यक्तीला दोरीच्या साह्याने बाहेर काढले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. परंतु विनायक यांची दुचाकी वाहून गेली.

सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जीव धोक्यात घालून, दुचाकी पाण्यात घातल्याबद्दल पोलिसांनी त्या युवकाला समज दिल्याची माहिती उपलब्ध दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.