Saturday, December 21, 2024

/

माहिती, सार्वजनिक संपर्क खात्याच्या आयुक्तपदी निंबाळकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि एडीजीपी हेमंत एम. निंबाळकर यांची सरकारने माहिती आणि सार्वजनिक संपर्क खात्याच्या आयुक्तपदी नियुक्ती केली असून त्यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

त्याचप्रमाणे आयुक्त असणारे आयपीएस अधिकारी विकास किशोर यांची बेंगलोर बीबीएमपी विशेष आयुक्त (आरोग्य) म्हणून बदली करण्यात आली आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांनी यापूर्वी देखील माहिती आणि सार्वजनिक संपर्क खात्याचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.

आता पुन्हा आयुक्त म्हणूनच कार्यभार स्वीकारणाऱ्या निंबाळकर यांचे सदर खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.