बेळगाव: – कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे सर्व दरवाजे शनिवारी पहाटे उघडल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे.हिप्परगी धरण प्रशासनाने सर्व 26 दरवाजे खुले केल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
रविवारी दुपारपर्यंत कृष्णेची पाणी पातळी किमान तीन फुटाने कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील व खास करून कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापूराला कर्नाटकातील हिप्परगी धरण कारणीभूत असल्याचे संदर्भ जोडण्यात आले आहेत. अलमट्टी आणि हिप्परगी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी मागणी होत होती.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णे सह सर्वच नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी रात्रीपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळी तब्बल सात फुटाने वाढ झाली.
नदीकडच्या गावांमध्ये पुराची धास्ती वाढली.त्यामुळे ही हिप्परगी धरणातून जादा पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी होत होती. शनिवारी पहाटे नंतर हिप्परगी धरण प्रशासनाने सर्व दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग सुरू झाला आहे.
अलमट्टीतून लाखाचा विसर्ग पूर्वस्थिती नियंत्रण खबरदारी,अलमट्टी धरणाचा इशारा संदेश*
घटप्रभा नदी (लोलासूर पूल) आणि कृष्णा नदीतून (कल्लोल बॅरेज) विसर्ग लक्षात घेता, अलमट्टी धरणातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, *”नदीकडे जाणारा प्रवाह सध्याच्या 1,00,000 क्युसेक वरून 21.07.2024 रोजी सकाळी 12:00 वाजता 1,25,000 क्युसेकपर्यंत वाढवला जाईल*. संबंधितांना विनंती आहे की अलमट्टी धरणाच्या डाउनस्ट्रीमवर सतर्क राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे