बेळगाव लाईव्ह : मुसळधार पावसामुळे नद्या – नाले ओसंडून वाहात असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
काही नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली असून याठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनासह प्रयेक विभाग खबरदारीच्या उपाययोजना आखत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज कागवाड तालुक्यातील जुगुळ गावात हेस्कॉम कर्मचाऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता काम बजावल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
सध्या सीमावर्ती भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत, अशा स्थितीत जीव मुठीत धरून नदीकाठावरील शेतात हेस्कॉमच्या कर्मचाऱ्याने पाण्यात उडी घेऊन वीजपुरवठा खंडित केल्याने अनर्थ टळला.
जुगुळ गावात इलेक्ट्रिक टीसीखाली पाणी असल्याने इलेक्ट्रिक टीसी पाण्याने खराब होऊन तो शॉर्ट होण्याची भीती व्यक्त होत होती. हि बाब लक्षात येताच हेस्कॉम कर्मचाऱ्याने थेट पाण्यात उडी घेऊन वीजपुरवठा बंद केला.
हेस्कॉम कर्मचाऱ्याने दाखवलेल्या या धाडसामुळे पुढील मोठा अनर्थ टळला असून या कर्मचाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. हेस्कॉम कर्मचाऱ्याने दाखविलेल्या धाडसाचे सर्वसामान्य नागरीकातून कौतुक होत आहे.