बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील गुणवंत विद्यार्थी आदित्य आनंद पाटील याने यंदाच्या झालेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग परीक्षेत 95 टक्के गुण मिळवून जैन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम, तसेच विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातून कर्नाटक राज्यात सुवर्ण पदकासह चौथा क्रमांक पटकावल्याबद्दल गावातील चांगळेश्वरी युवक मंडळातर्फे त्याचा काल रविवारी सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतिश बाळकृष्ण पाटील हे होते. त्यांच्यासह उद्योजक एन. डी. पाटील, श्रीकांत आप्पाजी पाटील, अनंत अप्पाजी पाटील, नामवंत अभियंता मनोहर सिद्धाप्पा पाटील, पत्रकार गंगाधर शंकर पाटील, शंकर रघुनाथ पाटील, अनिल पुंडलिक पाटील, पांडुरंग यशवंत पाटील, चंद्रकांत बाबुराव पाटील, उत्तम माऱ्याप्पा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार, शाल घालून आणि मानचिन्ह देऊन आदित्य पाटील याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी समायोचीत विचार व्यक्त करून आदित्य याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखिल आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कार याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आदित्य पाटील याने आपल्या शालेय जीवनापासून आजच्या यशापर्यंतच्या आपल्या शैक्षणिक प्रवासाविषयी थोडक्यात माहिती दिली. तसेच कुटुंबीयांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपण हे यश संपादन करू शकलो असे तो म्हणाला.
कार्यक्रमास सतीश गणपती पाटील, श्री चांगळेश्वरी युवा मंडळाचे कार्यकर्ते संदीप बा पाटील, अमोल अ. पाटील, अजय अ. पाटील, हेमंत प्र. पाटील, अक्षय मा. हट्टीकर, समर्थ न. पाटील, अमेय प्र. हट्टीकर, सुशांत सु. पाटील, साहिल श. पाटील, प्रज्वल अ पाटील, जय ग. पाटील आदींसह हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नारायण सोमान्ना पाटील यांनी केले.